आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंनी केलं म्याँव म्याँव....


आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंनी केलं म्याँव म्याँव.... मुंबई: राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते. त्यावेळी, नेमकं आदित्य ठाकरे पायरी चढून वर जात असताना, नितेश राणेंनी त्यांच्याकडे पाहून म्याव, म्याव... असा आवाज काढला. नितेश राणेंच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. 

सदर कृत्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हो, मी आदित्य ठाकरे यांना पाहून म्याव, म्याव केलं. कारण आधी वाघाची डरकाळी देणाऱ्या शिवसेनेची अवस्थाच म्याव, म्याव सारखी झाली आहे, असं नितेश राणे यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post