शरद पवार यांचे नातू रोहित पवार होणार नगर जिल्ह्याचे पालकमंत्री! सोशल मीडियावर चर्चेला उधाण...

 

शरद पवार यांचे नातू रोहित पवार होणार नगर जिल्ह्याचे पालकमंत्री! सोशल मीडियावर चर्चेला उधाण...मुंबई: राज्य मंत्रिमंडळात आमदार रोहित पवार यांचा समावेश होणार अशी जोरदार चर्चा समाज माध्यमात सुरू आहे.  राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच छोटा विस्तार होणार आहे. यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू व कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहीत पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे अशी चर्चा सुरू आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिमंडळात एक जागा रिक्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा भरली जाणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो व त्यात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना स्थान मिळू शकते. अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

 काही दिवसांपूर्वी कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचं कारण देत नगरचे विद्यमान पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी नकार दिल्याचं कळतंय. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही रोहित पवार यांच्याकडे सोपविली जाण्याची दाट शक्यात सूत्रांनी वर्तवली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post