गोविंद मोकाटे कुटुंबियांकडून बायजामाता मंदिरास देणगी

 मोकाटे यांच्याकडून बायजामाता मंदिरास देणगी नगर - नगर तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्या कुटुंबीयांकडून २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

      गोविंद मोकाटे यांचे वडील स्व. खंडू आसाराम मोकाटे यांच्या स्मरणार्थ बायजामाता मंदिर जीर्णोद्धारासाठी २५ हजार रुपये तर इमामपूर गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासाठी ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली. मोकाटे कुटुंबाच्या वतीने वडिलांच्या दशक्रिया विधी या कार्यक्रमात स्वर्गीय खंडू मोकाटे यांच्या स्मरणार्थ मंदिरांसाठी आर्थिक मदत देण्यात आली.


     तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंचक्रोशीतील प्रत्येक शाळेसाठी सॅनिटायझर, मास्क व कोरोना पासून मुलांचा बचाव होण्यासाठी लागणाऱ्या वस्तू देण्याचे मोकाटे कुटुंबियांच्या वतीने जाहीर करण्यात आले. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post