मोठा निर्णय...लस घेतली नसेल तर ‘या’ जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही...

 


नाशिक: राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लसीकरणावर जास्त भर देत आहे. मात्र तरीही अनेक नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याने आता सरकार आणि प्रशासन कठोर पावलं उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड प्रतिबंधक लस न घेतलेल्यांना नाशिक जिल्ह्यात प्रवेश न देण्याचा निर्णय नाशिक जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ  यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post