राज्यसेवा आयोगाची रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलली

 राज्यसेवा आयोगाची रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकललीमुंबई : कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांना संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे लवकरच नवं वेळापत्रक जाहीर होणार आहे. कोरोनामुळे मागील वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची   परीक्षा झाली नाही.   त्यामुळे ज्यांची वयोमर्यादा मागील वर्षी संपत होती ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकले नव्हते.  सरकारने आणि आयोगाने अशा विद्यार्थ्यांना आणखीन एक वर्ष ही परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परिक्षा नव्याने राबवावी लागणार आहे.  मागील वर्षी शेवटची संधी असलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षीच्या परिक्षा प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे लागणार आहे.  त्यामुळे दोन जानेवारीला होणारी ही परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.  परीक्षेचं नवं वेळापत्रक  लवकरच  जाहीर करण्यात येईल असं आयोगने म्हटलं आहे.  पोलीस उपअधीक्षक,  उपजिल्हाधिकारी , तहसीलदार अशा 390 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post