कर्जतमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा राष्ट्रवादीला पाठिंबा.... माजी मंत्री राम शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया...

 

कर्जतमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा राष्ट्रवादीला पाठिंबा.... माजी मंत्री राम शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया...
कर्जत: नगर पंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिबा तारेक सय्यद यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री राम शिंदे आणि खासदार  सुजय दादा विखे पाटील यांची काॅर्नर सभा शुक्रवारी सकाळी 11 वाजता संपन्न झाली आणि संध्याकाळी 5 वाजता भाजप उमेदवार सय्यद यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे कर्जतचे राजकारण तापले आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.कर्जत - जामखेड चे विद्यमान आमदार यांचे हेच विकासाचे राजकारण का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.मविआ सरकारकडून लोकशाहीची सारीच मूल्य पायदळी तुडवली जात आहेत.कर्जत नगरपंचायतीत धमकावून अनेकांना अर्ज मागे घ्यायला लावले.आज प्रभाग 14च्या भाजपा उमेदवार शिबा सय्यद यांना राकाँत प्रवेश दिला.सकाळीच त्यांच्या प्रचारार्थ सभा झाली होती.हा सत्तेचा दहशतवाद असून जनता तुम्हाला माफ करणार नाही!, अशा शब्दांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post