अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणूक कोणत्या तालुक्यात कीती टक्के मतदान वाचा सविस्तर...

 अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणूक कोणत्या तालुक्यात कीती टक्के मतदान वाचा सविस्तर...

जिल्हा परीषद पतसंस्था निवडणुक

अहमदनगर जिल्हा परीषद सर्व्हन्टस को-आॕप क्रेडीट सोसायटी निवडणुक - २०२१/२२ ते २०२६/२७
अहमदनगर टिळकरोड येथील पटेल मंगल कार्यालय तसेच जिल्ह्यातील १४ पंचायत समिती येथे आज सकाळी ८ ते ४ मतदान झाले असुन उद्या पटेल मंगल कार्यालय येथे सकाळी ८ वाजता मतमोजणी होणार आहे एकुण २५३८ मतदारापैकी २३१३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे एकुण ९१:१३ टक्के मतदान झाले असुन या सोसायटीमधे एकुण २१ उमेदवार निवडले जातील यात मुख्यालय मतदार संघातुन २, महिला राखीव मतदार संघातुन २, तालुका मतदार संघातुन प्रत्येकी १ असे चौदा तालुक्यातुन १४, इतर मागास वर्ग मतदारसंघातुन १, अनुसुचीत जाती जमाती मतदार संघातुन १, वि.जा.भ.ज मतदार संघातुन १ या पद्धतीने २१ सदस्य निवडले जातील या करीता एकुण ६९ उमेदवार या निवडणुकीत उमेदवारी करत होते.
निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप निबंधक सहकारी संस्था के.आर.रत्नाळे तसेच सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन मुख्य लिपीक संजय बनसोडे व गणेश सावंत यांनी काम पाहीले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post