'शिपी आमटी'चे कौतुक करत हार्दिक पटेल यांचे कर्जतकरांना आवाहन, भाजपवर सडकून टीका


शिपी आमटीचे कौतुक करत हार्दिक पटेल यांचे कर्जतकरांना आवाहन, भाजपवर सडकून टीकानगर : कर्जत नगर पंचायतची निवडणूक सुरू आहे. ही निवडणूक भाजपचे माजी मंत्री राम शिंदे  व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी मोठी सभा शुक्रवारी कर्जतमध्ये झाली. या सभेत काँग्रेसचे गुजरात मधील नेते हार्दिक पटेल उपस्थित होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. 

हार्दिक पटेल म्हणाले, गुजरातमध्ये आम्ही चांगल्या चांगल्यांना पाणी पाजले आहे. मी पूर्वी रायगड जिल्ह्यातील कर्जतचे नाव ऐकले होते. मात्र मागील दोन वर्षापासून देशात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतचे नाव रोहित पवारांमुळे गाजत आहे. मी त्या गुजरातमधून येत नाही की जेथील दोन-तीन व्यक्ती दिल्लीत आहेत. मी महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधून आलो आहे. गुजरात मॉडेलच्या नावाखाली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मात्र हे गुजरात मॉडेल फसवे आहे. गुजरातमधील 50 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गुजरातमध्ये 50 लाख तरुण बेरोजगार आहेत. तिथे एकाच वर्षात 50 हजार कोटीचे ड्रग्ज पकडले गेले. या गोष्टी कोणीही सांगत नाही. भाजप खोट सांगून सत्ता मिळवते.

कर्जतची शिपी आमटी मी खाल्ली. एका शिपी आमटीत पोट भरतं. त्यातून ताकद आली. ही शिपी आमटी कर्जतचे लोक रोज खातात. त्यांच्यात किती ताकद असेल. त्या ताकदीच्या जोरावर त्यांनी भाजपला जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही हार्दिक पटेल यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post