उद्धव ठाकरेंचा पुतण्या हर्षवर्धन पाटलांचा जावई, अंकिता-निहार विवाह बंधनात

 उद्धव ठाकरेंचा पुतण्या हर्षवर्धन पाटलांचा जावई, अंकिता-निहार विवाह बंधनातमुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील यांचा मोठ्या शाही थाटात आज मुंबईमध्ये ‘ताज’ हॉटेलमध्ये विवाह संपन्न झाला. या निमित्ताने ठाकरे आणि पाटील घराण्याचे नवीन ऋणानुबंध तयार झाले आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून या विवाहाची चर्चा होती, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांना लग्नासाठी निमंत्रण देण्यासाठी हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील दोघेही गेले होते, त्या फोटोचीही बरीच चर्चा होती. आज अखेर हा विवाहसोहळा संपन्न झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post