नगरमध्ये शिवसेनेचे नूतन शहरप्रमुख राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करतात, कॉंग्रेसच्या गंभीर आरोपाने खळबळ...


नगरमध्ये शिवसेनेचे नूतन शहरप्रमुख राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करतात, कॉंग्रेसच्या गंभीर आरोपाने खळबळ...नगर : प्रभाग ९ च्या मनपा पोटनिवडणुकीत प्रचाराचा काल शुभारंभ करण्यात आला. महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या सुरेश तिवारी या उमेदवारांच्या प्रचाराचा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. काँग्रेसचा एकही नेता, पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हता. मात्र तिवारी यांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रचाराच्या पॅम्पलेट वरून नवीन वादंग उभे राहिले आहे. काँग्रेस नेत्यांचा अवमान काँग्रेस कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत, असा आक्रमक इशारा काँग्रेसच्या क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

*महाविकासआघाडी झाली असे आपण म्हणता. तसा सर्व ठिकाणी भाषणांमध्ये उल्लेख करता. मग अर्ज दाखल करताना काँग्रेसच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांना आपण समवेत घेऊन अर्ज दाखल केला ? प्रचाराचा शुभारंभ करतांना काँग्रेसला आपण निमंत्रण का दिले नाही ? या  पॅम्पलेटवर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराचे नेते या नात्याने किरण काळे, याच प्रभागातील काँग्रेस पक्षाचे शहराचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष, माजी महापौर तसेच प्रदेश काँग्रेसचे सचिव दीप चव्हाण तसेच काँग्रेस पक्षाच्या याच प्रभागातील विद्यमान लोकप्रिय नगरसेविका शीला चव्हाण यांचा फोटो जाणीवपूर्वक या पत्रकावर टाकण्यात आलेला नाही. याकडे काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे लक्ष वेधले आहे.**विद्यमान प्रभारी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या दबावातून हे कृत्य केलेले आहे.  या पूर्वीचे शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते शिवसेनेचे नेतृत्व करत असताना असे कधी काँग्रेसच्या बाबतीमध्ये घडले नव्हते. शिवसेनेच्या मदतीला काँग्रेस व काँग्रेसच्या मदतीला शिवसेना सतत धावून आली आहे हा इतिहास आहे. सातपुते यांची सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असायची. ते स्व. अनिलभैया राठोड यांच्या प्रेरणेने चालायचे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे हे तर काँग्रेसचे नेते असून देखील उघडपणे वारंवार सांगत असतात की आम्ही स्व.अनिलभैया राठोड यांच्या प्रेरणेने काम करतो. स्व.अनिलभैया राठोड यांनी एका ठराविक प्रवृत्तीच्या विरोधामध्ये कायम या शहरामध्ये लढा उभारला होता. ते आज हयात असते तर या प्रभागातील निवडणुकीतील चित्र देखील वेगळे राहिले असते. मात्र काही मंडळींनी त्याला आता मूठमाती देऊन वैयक्तिक स्वार्थासाठी काही प्रवृत्तींशी जुळवून घेतले आहे. कुणी कुणाशी अंधारात काय जुळवुन घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काँग्रेस ही कोणाच्या दावणीला बांधलेली नसून काँग्रेसच्या राज्य व शहर स्तरावरील कोणत्याही नेत्याचा अवमान काँग्रेस कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत, असा स्पष्ट इशारा प्रवीण गीते पाटील यांनी काँग्रेसच्या वतीने दिला आहे.*


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post