माजी क्रिकेटपटूसह २ कॉंग्रेस आमदार भाजपात दाखल..

 माजी क्रिकेटपटूसह २ कॉंग्रेस आमदार भाजपात दाखल..नवी दिल्ली:  विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. एका माजी क्रिकेटरसह २ काँग्रेस आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. यात माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा समावेश आहे. त्यांनी मंगळवारी (२८ डिसेंबर) भाजपात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय काँग्रेसच्या २ आमदारांनीही भाजपात प्रवेश केला आहे.

४४ वर्षीय हा डावखरा फलंदाज पंजाबमधील आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनेश मोंगियाचा भाजपा प्रवेश झाला आहे. याशिवाय विद्यमान काँग्रेस आमदार फतेह सिंग बाजवा आणि बदविंदर सिंग लड्डी यांनी देखील भाजपात प्रवेश केलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post