अखेर जे नको व्हायचे ते झालेच राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव

 राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉनची लागण झालेला रुग्ण आढळलामुंबई : अखेर महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा  शिरकाव झाला आहे. कल्याण डोंबिवली  मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे.


दरम्यान, देशातील सुरुवातीला कर्नाटकमध्ये दोन व्यक्तींना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर आज गुजरातमध्येही एका वृद्ध व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचं आता आढळून आलं आहे. कल्याण-डोंबिवलीमधील एका 33 वर्षीय तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. हा तरुण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून मुंबईत आला होता. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. जिनोमि सिक्वेन्सिंगसाठी त्याचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज या तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post