भ्रष्टाचाराच्या आरोपावर भाजप आमदाराची तिखट प्रतिक्रिया... म्हणाले घरदारासह सगळं तुमच्या नावावर करून जिल्हा सोडून जातो...

 

भ्रष्टाचाराच्या आरोपावर भाजप आमदाराची तिखट प्रतिक्रिया... म्हणाले घरदारासह सगळं तुमच्या नावावर करून जिल्हा सोडून जातो... बीड: बीड जिल्ह्यातील देवस्थान जमिनीचा घोटाळ्याच्या आरोपानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  आष्टीतील देवस्थान आणि इनामी जमिनीपैकी काही जमीन खोट्या कागदपत्राद्वारे धस यांनी लाटल्याचा आरोप करण्यात आलाय. या आरोपाला उत्तर देताना धस यांनी शिरुरमधील जाहीर सभेत आपल्या खास अंदाजात उत्तर दिलं.धस यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देताना विरोधकांना थेट आव्हान दिलंय. ‘औरंगाबादला पत्रकार परिषद घ्यायची. इकडे भ्रष्टाचार, तिकडे आमकं. माझ्याकडे हजार कोटींचा आकडा सांगितला. हजार कोटी म्हटल्यावर मी म्हटलं सगळं सोडून जातो’, असंही धस म्हणाले. त्याचबरोबर ‘मला हजार कोटी नको. मला पन्नास कोटीच द्या. माझ्या बाप-जाद्याची जी काही संपत्ती आहे, तुम्ही म्हणता मी कमावलेली आहे. ती घरादारासकट तुमच्या नावावर करुन देतो. अख्खा जिल्हा सोडून जातो. पन्नासच द्या, हजार कशाला’, असं उत्तर धस यांनी दिलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post