आरोपीचा बचाव करण्यासाठी बलात्कार प्रकरणाला हनी ट्रॅपचे वळण, गोविंद मोकाटेंच्या भावावर आरोप...

 आरोपीचा बचाव करण्यासाठी बलात्कार प्रकरणाला हनी ट्रॅपचे वळण -सुशांत म्हस्के

सत्यता पडताळून गुन्हा दाखल झाला असताना आरोपीचा भाऊ चुकीचे वक्तव्य करुन बदनामी करत असल्याचा आरोप नगर - बलात्काराचा गुन्हा असलेल्या आरोपीचा बचाव करण्यासाठी त्याचा बंधू बलात्कार प्रकरणाला हनी ट्रॅपचे वळण देऊन पीडित महिलेची बदनामी व सर्व प्रकाराला राजकीय वळण देऊन दिशाभूल करत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केला आहे. तर सत्यता पडताळून गुन्हा दाखल झाला असताना आरोपीच्या भावाने चुकीचे वक्तव्य करुन बदनामी केल्याप्रकरणी त्याच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे म्हस्के यांनी केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष या पदावर अनेक वर्षापासून काम करत आहे. पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. 4 डिसेंबर रोजी पीडित महिलेने माजी पंचायत समिती सदस्य गोविंद अण्णा मोकाटे यांच्यावर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे. तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी सर्व चौकशी करून, संपूर्ण पुरावे तपासून गुन्हा दाखल केला आहे. परंतु आरोपी मोकाटे यांचे बंधू सुंदर मोकाटे हे त्या प्रकरणी बेछूट पोलिस प्रशासन व न्यायव्यवस्थेवर विश्‍वास न ठेवता पुरावे बनावट असल्याचे वक्तव्य सातत्याने करत आहे. पुरावा बनावट आहे की, खोटे  हे निष्पन्न करण्याचे काम न्यायालयाचे आहे. तरी देखील या बलात्काराच्या प्रकरणाला हनी ट्रॅपचे वळण देऊन पीडित महिलेची बदनामी केली जात असल्याचे म्हस्के यांनी निवेदनात म्हंटले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post