मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब गंगेकर, व्हाईस चेअरमनपदी प्रमिलाताई पवार

 अहमदनगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या  चेअरमनपदी बाळासाहेब गंगेकर तर व्हाईस चेअरमन पदी प्रमिला ताई पवार यांची बिनविरोध निवड


सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू : चेअरमन बाळासाहेब गंगेकर नगर   : अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेची नुकतीच पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुक संपन्न झाली. आज निवडणूक निर्णय अधिकारी के.के आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक पार पडली असून चेअरमन पदी बाळासाहेब पवार  यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. सूचक म्हणून सतिष ताठे व अनुमोदक म्हणून कैलास चावरे होते. व्हाईस चेअरमन पदी प्रमिलाताई पवार यांचाही एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. सूचक म्हणून श्रीधर देशपांडे तर अनुमोदक म्हणून गुलाबराव गाडे होते. चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी के.के आव्हाड यांनी बिनविरोध निवड आल्याची घोषणा केली. यावेळी संचालक बाबासाहेब मुदगल, विकास गीते, शेखर देशपांडे, बलराज गायकवाड, अजय कांबळे बाळासाहेब पवार, विजय कोतकर, संचालिका उषाताई वैराळ, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी, आदी उपस्थित होते.


        चेअरमन बाळासाहेब गंगेकर म्हणाले की सभासदांनी निवडणुकीमध्ये सहकार पॅनेलच्या उमेदवारवर विश्वास ठेवून सर्व उमेदवारांना मोठ्या मताने विजय केले. पुढील पाच वर्षामध्ये सभासदांचा विश्वास सर्व संचालक मंडळ सार्थ ठरवेल व पतसंस्थेच्या कारभाराच्या माध्यमातून पतसंस्थेचा नावलौकिक निर्माण करु. सभासदांच्या हितासाठी विविध निर्णय घेणार आहे. आम्ही सर्व संचालक मंडळ एक दिलाने काम करू असे ते म्हणाले.
      यावेळी व्हाईस चेअरमन प्रमिलाताई पवार यांनी सर्वांचे आभार मानले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post