देवेंद्र फडणवीस शाळेत असताना भाजपचे फक्त २ खासदार होते.....

 अमृत पिऊन कोणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीसांना कळायला हवं - ना. नवाब मलिक मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते खा. शरद पवार  हे पंतप्रधान होतील, असा दावा पक्षाने अथवा पवार साहेबांनी केलेला नाही. याउलट पवार  सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणतील आणि विरोधकांच्या एकजुटीतून मोदी सरकारला सत्तेतून बाहेर जाईल, असा आमचा प्रयत्न असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस तुम्ही शाळेत असताना १९८४ साली भाजपची संख्या दोनवर गेली होती. तेव्हा तुमचे खासदार सायकलवरून डबलसीट यायचे हे तुम्ही विसरलात का, असा टोला मलिक यांनी लगावला. लोकशाहीत अमृत पिऊन कोणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पवार साहेबांवर टीका केली. ते जेव्हाही पवार साहेबांवर टीका करतात तेव्हा काही ना काही चमत्कार घडतो. त्यांच्या टीकेमुळेच असा चमत्कार आम्ही २०२४ सालीही घडवून आणू, असा दावा मलिक यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post