हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन

 

हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधननवी दिल्ली : संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत  यांना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह  यांचे निधन झाले. बंगळुरुतील रुग्णालयात आठवड्याभराच्या उपचारांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली. 8 डिसेंबरला तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 11 लष्करी अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. वरुण सिंह यांच्या निधनाने अतीव दुःख झाल्याच्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post