मनपा कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत अपक्ष उमेदवार अशोक आजबे यांचा सहकार पॅनला पाठिंबा

 मनपा कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत अपक्ष उमेदवार अशोक आजबे यांचा सहकार पॅनला पाठिंबाअहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सहकार पॅनलने प्रचारात आघाडी घेऊन केलेल्या विकास कामाचे मुद्दे मतदारांसमोर मांडले आहे, मोठ्या संख्येने मतदारांचा पाठिंबा सहकार पॅनला मिळत असून अनेक अपक्ष उमेदवार आपले उमेदवारी अर्ज माघारी घेऊन सहकार पॅनला पाठिंबा देत आहे यातच अपक्ष उमेदवार अशोक आजबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन सहकार पॅनला पाठिंबा दिल्याबद्दल पॅनलच्या वतीने त्यांचा सत्कार करताना पॅनल प्रमुख बाबासाहेब मुदगल, मार्गदर्शक जितेंद्र सारसर,मा.नगरसेवक अनिल शेकटकर तसेच सहकार पॅनलचे उमेदवार यावेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post