खुद्द शरद पवारांनी पिचडांविरोधात बांधलेली मोट सुटली....अकोलेत मोठ्या राजकारणाची चर्चा

खुद्द शरद पवारांनी पिचडांविरोधात बांधलेली मोट सुटली....अकोलेत मोठ्या राजकारणाची चर्चा मागील विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी पक्षातून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड  यांचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोलेत अशोक भांगरे यांना मोठी ताकद दिली होती. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि भांगरे यांच्यात पटलेच नाही. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत फूट पडली असून आता भांगरे हे उघडपणे माजी आमदार पिचड यांच्यासोबत गेलेले पाहायला मिळत आहेत.  अकोले नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. ही निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढली गेली. निकाल काय असेल ते पुढील महिन्यात मोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, मधल्या काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भांगरे आणि भाजपचे माजी आमदार वैभव पिचड मात्र एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. तीव्र राजकीय मतभेद असलेले हे दोघे नेते आदिवासींच्या सामाजिक, धार्मिक प्रश्नावर एकत्र आल्याचे सांगण्यात येते.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post