वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटर, वरळी येथे विशेष व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यातील लोकांना हा डिजीटल स्वरूपातील कार्यक्रम पाहता आला. अस्वस्थ माणसाच्या सुख-दुःखात जो समरस झाला नाही तो खरा कार्यकर्ता नाही. म्हणून समाजातील प्रत्येक घटकांशी बांधिलकी हे सूत्र मनात ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहीजे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे आपण नाव घेतो त्याचे कारण त्यांची विचारधारा आहे. त्यांची दृष्टी समाजाला पाच-पन्नास वर्ष पुढे नेणारी होती. त्यांच्या सूत्रावर आधारित काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ही भावना मनात ठेवून काम करा, असे मार्गदर्शन यावेळी पवार साहेबांनी कार्यकर्त्यांना केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन ॲपचे उद्घाटनही करण्यात आले. युवा पिढीला डोळ्यांसमोर ठेवून हे ॲप तयार करण्यात आले आहे. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीमध्ये या ॲपची महत्त्वाची भूमिका असेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, रोजगार व कौशल्य विकास मंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनिल तटकरे, खा. अमोल कोल्हे, आ. सतीश चव्हाण, मुंबई महापालिकेच्या गटनेत्या व नगरसेविका राखीताई जाधव, माजी खासदार माजिद मेमन, माजी आमदार विद्या चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, मुंबई महिला प्रदेशाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, आनंद शिंदे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post