ब्रेकिंग... कर्डीले यांच्या घरातील लग्नाला हजारोंची गर्दी, प्रशासनाने ठोठावला दंड

.नगर : लग्नसराईला सुरुवात झाली आहे. या वर्षी राज्यातील दिग्गज नेत्यांची मुलं आणि मुली विवाहबंधनात अडकत आहेत.  भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले यांचादेखील विवाह झाला.बुर्हाणनगर येथे अतिशय थाटामाटात हा विवाह पार पडला..या बाबत जिल्हा पोलीसदालने विवाहाच्या आधीच लग्न सोहळा आयोजकांना नोटीस दिली होती.मात्र प्रशासनाने कोरोना प्रतिबंध नियमावली जाहीर करण्याआधी लग्न पत्रिका पाठवण्यात आल्या होत्या त्या मुळे लग्नाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. असे आयोजकांनी सांगितले होते त्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती त्या मुळे पोलिसांनी या लग्न सोहळ्यात गर्दी केली म्हणून कोविड प्रतिबंधक नियम भंग केल्यामुळे लग्न सोहळा आयोजकांना दहा हजारांचा दंड करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post