मनपा मालक संस्थेच्या दरबारात सहकार पॅनलच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन. सभासदांच्या हितासाठी पारदर्शी कारभार हाच आमचा अजंठा.

 मनपा मालक संस्थेच्या दरबारात सहकार पॅनलच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन.


सभासदांच्या हितासाठी पारदर्शी कारभार हाच आमचा अजंठा.110 वर्षात प्रथमच क्रांतिकारी निर्णय घेऊन मनपा पतसंस्था स्व भांडवली केली.


अहमदनगर प्रतिनिधी: मनपा कर्मचारी पतसंस्थेचे पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक सुरू असून सहकार पॅनेलचे उमेदवारांनी आज मनपा मालक  प्रशासकीय इमारती मध्ये जाहीरनाम्याचे प्रकाशन करून सभासदांच्या भेटीगाठी घेऊन जाहीरनाम्याचे वाटप केले‌.  गेल्या तीन वर्षांमध्ये मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेने सभासदांचे हिताचे निर्णय घेऊन 110 वर्षात प्रथमच क्रांतिकारी निर्णय घेतला व संस्था स्व भांडवली केली. त्यामुळे सभासदांच्या कर्जावरील व्याजदरात 16% वरून 12% वर आणता आले. त्यामुळे कर्जदार सभासदाला दर माहा सुमारे पंधराशे रुपयेचा आर्थिक लाभ झाला आहे. याच बरोबर सभासदांच्या हितसाठी पारदर्शी कारभार हाच आमचा अजिंठा असल्याचे प्रतिपादन सहकार पॅनलचे प्रमुख बाबासाहेब मुदगल व जितेंद्र सारसर यांनी केले

           मनपा मालक संस्थेच्या दरबारात सहकार पॅनलच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करताना पॅनल प्रमुख बाबासाहेब मुदगल, मार्गदर्शक जितेंद्र सारसर, विजय कोतकर, अजय कांबळे, बलराज गायकवाड, विकास गीते, कैलास चावरे, सतिष ताठे, श्रीधर देशपांडे, बाळासाहेब पवार, सोमनाथ सोनवणे, प्रमिलाताई पवार, उषाताई वैराळ, किशोर कानडे, बाळासाहेब गंगेकर, आदी उपस्थित होते.

        यावेळी पॅनल प्रमुख बाबासाहेब मुदगल व जितेंद्र सारसर म्हणाले की पतसंस्थेच्या सर्वांगीन विकासाबरोबरच सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार केला. यापुढेही सभासदांच्या सूचनांचे पालन करून निर्णय घेतले जाईल. पतसंस्थेने सभासदांना वैद्यकीय मदत, कोरोणा काळात मृत्यू पावलेल्या सभासदांना पन्नास हजाराची मदत, सभासदांच्या मुला-मुलींसाठी शालेय शिक्षणात मदत, सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, आदी विविध उपक्रम राबवले गेले आहेत. यापुढील काळात कर्जावरील व्याजदर दहा टक्क्यांपेक्षाही कमी करणार आहे, सर्वसाधारण कर्ज मध्ये सात लाखापर्यंत वाढ करणार आहे, तातडीची कर्ज मर्यादा पन्नास हजारापर्यंत वाढविण्यात आहे, सभासदांना सणासुदीत साठी पंचवीस हजार पर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे, सभासदाच्या मुलीच्या लग्नसोहळ्यासाठी  कन्यादान योजना व सुने करता सून मूक योजना राबवणार आहे, सभासदाच्या पाल्याच्या अकरावी शिक्षणाचा प्रवेशासाठी संस्थेमार्फत मोफत आर्थिक मदत करणार आहे, एक लाखापर्यंत आर्थिक वैद्यकीय मदत करनार आहे, सभासद व कुटुंबीय करतात आरोग्य सेवेमध्ये अत्यावश्यक पॅथॉलॉजी सेवेचा खर्च संस्था करणार आहे, कर्जदार सभासद मयत झाल्यास त्यावरील संपूर्ण कर्ज माफ करणार आहे, मनपा सेवेतून सेवानिवृत्त सभासदाचा येथोचित गुणगौरव करणार आहे आदीसह पुढील काळात विविध निर्णय घेऊ असे ते म्हणाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post