श्रीगोंद्यात राजकारण तापले.... प्रतिभाताई पाचपुते विरोधकांवर बरसल्या...


श्रीगोंद्यात राजकारण तापले.... प्रतिभाताई पाचपुते विरोधकांवर बरसल्या... नगर :  जिल्हा परिषद, पंचायत समिती, साखर कारखान्यांच्या निवडणुका नजीक आल्याने   श्रीगोंदा तालुक्यातील राजकारण तापले आहे. तालुक्यात विरोधकांकडून भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार बबनराव पाचपुते (यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रतिभा पाचपुते यांनी विरोधाकांवर जोरदार टीका केली आहे. 

श्रीगोंदे फॅक्टरी येथील रस्त्याचे भूमिपूजन प्रतिभा पाचपुते यांच्या हस्ते झाले.  यावेळी भगवानराव पाचपुते, सुवर्णा पाचपुते, संदीप नागवडे, काका रोडे, अशोक काळाणे, महेश दरेकर, बंडू लोणकर, सुदाम पवार, प्रकाश उंडे, प्रेमराज धस, राहूल भंडारी आदी उपस्थित होते.

प्रतिभा पाचपुते म्हणाल्या, श्रीगोंदे तालुक्यात आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून मागील 41 वर्षे झाली विकासाचे पर्व सुरु आहे. सत्तेत असताना त्यांनी भरभरुन दिले आणि सत्ता नसतानाही त्यांनीच सरकारी योजनांचा पाठपुरावा केला. 40 वर्षांपूर्वीचा तालुका आणि आजचा श्रीगोंदे यात मोठा फरक असला तरी विकास कुठे झाला असे म्हणणाऱ्यांच्या डोळ्याला पट्टी बांधल्याने त्यांना विकास दिसत नसल्याची टीका, प्रतिभा पाचपुते यांनी केली.

त्या पुढे म्हणाल्या, आमचा विवाह झाला. त्यावेळी कावीळ झाली तर खाण्यास ऊस मिळत नव्हता. आज तालुक्यात चार साखर कारखाने सुरु असतानाही बाहेरचे अनेक कारखान्यांना पुरेल एवढा ऊस शिल्लक असतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post