त्यांनी राजकारणाची पातळी खाली नेली....राज्यमंत्री तनपुरेंची कर्डिलेंवर टिका

त्यांनी राजकारणाची पातळी खाली नेली....राज्यमंत्री तनपुरेंची कर्डिलेंवर टिका नगर   -भाजप सरकारच्या काळात जरी वीज बिल वसुली झाली नसली तरी तत्कालीन राज्य सरकारने महावितरण कंपनीला तेवढ्या प्रमाणात अनुदान देणे गरजेचे होते, अनुदान न दिल्यामुळे   महावितरणची दुर्दशा झाली आहे. त्यावेळी थकबाकी जवळपास 30 हजार कोटींच्या घरात होती भाजप सरकारने वितरण कंपनीला अनुदान दिले असते तर.आता सत्तर हजार कोटी रुपायाच्या घरात गेली नसती. या थकबाकीला  भाजप सरकार जबाबदार आहे . याचा भुर्दड आता  शेतकऱ्यांना भरण्याची वेळ आली आहे अशी टिका राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली


.नगर तालुक्यात  मांजरसुबा येथे ८ कोटी २३ लाख रुपये किंमतीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष उद्धव  दुसुंगे , राजैद्र भगत  , रघुनाथ झिने , जालींदर कदम , डॉ. राम कदम , रोहीदास कर्डीले, सिताराम काकडे, पुरवठा अधिकारी विश्वास आढाव  उपस्थित होते . यावेळी तनपुरे म्हणाले नगर तालुक्याचे सुडाचे राजकारण चालते  लोकांना निवडणुकीत पडून देखील अजून समज आली नाही. राष्ट्रवादीच्या  कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. आम्ही कार्यकर्त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील कोणत्याही दबावाला बळी पडू नये. मात्र, अशा लोकांच्या वागण्यावरून त्यांनी राजकारणाची पातळी किती खाली नेली असा टोला माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे नाव न घेत तनपुरे  यांनी लावला .  यावेळी तहसील विभागाच्या वतीने  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते आदीवासी भिल्ल समाजाच्या ७६ कुंटुबाना  रेशनकार्ड  वाटप करण्यात आले . पिंपळगाव माळवी येथे नवीन सबस्टेशन मंजुर करण्यात आले आहे या भागात विजेचा प्रश्न कायम स्वरुपी सुरणार आहो . वडगाव व पिपळगाव येथील शेतकऱ्याच्या उताऱ्यावरील शासनाचा शिक्का हि लवकर निघणार असल्याचे यावेळी सांगीतले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post