महाविकास आघाडीत ठिणगी.... राहुल गांधी यांच्या सभेला परवानगी नाकारल्याने कॉंग्रेस न्यायालयात

 

महाविकास आघाडीत ठिणगी.... राहुल गांधी यांच्या सभेला परवानगी नाकारल्याने कॉंग्रेस न्यायालयातमुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा मुंबई दौरा निश्चित झाला होता. तसंच काँग्रेस स्थापना दिनी म्हणजे 28 डिसेंबर रोजी त्यांची मुंबईत सभाही घेण्यात येणार होती. मात्र, काँग्रेस सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारनंच  राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारली आहे! राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेस नेते चांगलेच नाराज झालेत आणि त्यांनी आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.राहुल गांधी यांची 28 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये सभा घेण्यात येणार होती. महाराष्ट्र काँग्रेसकडून त्याबाबत जय्यत तयारीही सुरु करण्यात आली होती. त्यानुसार काँग्रेसकडून मुंबई महापालिका, नगरविकास खात्याकडे सभेच्या परवानगीसाठी 15 दिवसांपूर्वीच अर्ज केला होता. मात्र, अद्यापही त्याला प्रतिसाद दिला गेला नाही आणि आता राहुल गांधी यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप नाराज झाले आहेत. तसंच काँग्रेसकडून आता उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post