मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री अचानक विधानभवनात... अधिवेशनाआधी केली पाहणी

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री अचानक विधानभवनात... अधिवेशनाआधी केली पाहणीमुंबई: प्रकृतीच्या कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही. पण शुक्रवारी रात्री अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात पोहोचले होते. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वत: येऊन विधानभवनाची पाहणी केली. अचानक मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  यांनी शुक्रवारी रात्री ८ वाजता विधान भवनात अचानक भेट दिली आणि हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीची पहाणी केली. त्याच बरोबर त्यांनी अधिवेशन काळात विधान भवनात कुठेही चालण्याचा त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालण्याचा सरावही केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post