अमित देशमुख राज्यस्तरिय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत

अमित देशमुख राज्यस्तरिय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानीतनगर  प्रतिनिधी :  अमित देशमुख उपविभागीय डाक निरीक्षक, कर्जत यांना नुकतेच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार 2020 हा पुरस्कार नुकताच त्यांना प्राप्त झाला.


या पुरस्काराची घोषणा गतवर्षी झाली होती पण कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्याचे वितरण झालेले नव्हते.

 अमित देशमुख यांनी नुकताच हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने झूम मिटिंगद्वारे हा पुरस्कार स्वीकारला.या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, ट्रॉफी, मानपत्र, फेटा व मानाची शाल असे असून त्याना हे सन्मानपूर्वक वितरित  करण्यात आले.


याचे वितरण मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी  मुंबई या संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री कृष्णाजी जगदाळे यांचे हस्ते आॕनलाईन पध्दतीने झाले होते. व हा पुरस्कार  नुकताच श्री देशमुख यांना पोस्टाने प्राप्त झाला.


  श्री देशमुख हे सतत सामाजिक कामात सतत सहभाग घेत असतात ,मागील तीन महिन्यात अमित देशमुख यांना  मा प्रा राम शिंदे, मा आ श्री रोहितजी पवार,हिवरे बाजारचे भाग्यविधाते मा श्री पोपटरावजी पवार,मा श्री चंद्रशेखरजी यादव  पोलीस निरीक्षक कर्जत यांचे प्रमुख उपस्थितीत श्री देशमुख यांना स्वच्छतादूत म्हणून सन्मानित करण्यात आले आले.


राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबदल  त्याचे  टपाल कर्मचारी संघटनेचे नेते संतोष यादव, श्री अशोक बंडगर,श्री शंकर कडभणे, श्री एलियास शेख, श्री नाना रासकर,श्रीमती गीता धोंडे,श्रीमती रोहिणी घटेवार, श्री सुनिल धस,श्री संदीप कोकाटे,श्री कमलेश मिरगणे,श्री रावसाहेब चौधरी,श्री दत्तात्रय शिंदे,श्री प्रफुल्ल वाघमारे यांचे सह अनेकांनी अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post