शोषखड्ड्यात पडून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू...नगर जिल्ह्यातील घटना

शोषखड्ड्यात पडून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू...नगर जिल्ह्यातील घटना

  

प्रातिनिधीक छायाचित्र

संगमनेर तालुक्यातील माहुली येथील नाशिक-पुणे महामार्गालगत हॉटेल निलायम समोर असलेल्या शोषखड्ड्यात पडून साडे पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दानवी उर्फ परी दर्शन मंचरे (वय ५.५ वर्षे, रा. गणेश नगर, सप्तश्रृंगी मंदिरासमोर, अकोले बायपास रोड संगमनेर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहुली येथील हॉटेल निलायमने सांडपाणी मुरवण्यासाठी पुढील बाजूस शोषखड्डा मारला आहे. खड्ड्यालगत पाणी उडविणारे कारंजे आहेत.       


       

दर्शन तात्यासाहेब मंचरे व त्यांची मुलगी परी उर्फ दानवी मंचरे  (रा. गणेश नगर, सप्तश्रृंगी मंदिरासमोर, अकोले बायपास रोड संगमनेर) हे रविंद्र बाबासाहेब लेंडे (रा.खंदरमाळवाडी ता. संगमनेर) यांच्याकडे कामानिमित्त आले होते ते घरी परतत असताना हॉटेल निलायम येथे थांबले होते. हॉटेल निलायम लगतच्या हॉटेल समोर एका बसने अचानक पेट घेतल्याने दोघांचेही लक्ष त्या बसकडे गेले. त्याच दरम्यान परी खेळत खेळत समोरील कारंजाकडे गेली. खेळत असताना परी अचानक कारंजालगत असलेल्या खड्ड्यात पडली. खड्ड्यातून परीला बाहेर काढत तात्काळ १९ मैल येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करत परीला मृत घोषीत केले. 

2/Post a Comment/Comments

Post a Comment

Previous Post Next Post