केडगाव मुस्लिम कब्रस्तान येथे शहिदांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

 केडगाव मुस्लिम कब्रस्तान येथे शहिदांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केडगाव जागरूक नागरिक मंच च्या वतीने शाही जामिया मस्जित केडगाव येथे तामिळनाडूतील कुन्नूर येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेतील भारताचे प्रथम तीन्ही दलाचे रक्षा प्रमुख दिवंगत मेजर जनरल बिपिन रावत त्यांची पत्नी मधुलिका रावत व अन्य बारा शहीद साथीदार यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मरणार्थ कर्नल उस्मान आझाद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वड पिंपळ, चिंच , गुलमोहर , शिसम,  शॉवर ,रेइंट्री ,आंबा ,जांभूळ असे १५ वृक्ष तसेच सुशोभीकरणासाठी पामचे वृक्ष लावण्यात आले. मंचातर्फे सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माझे जवळचे मित्र बिपिन रावत व भारत भूमी चे सुपुत्र गेल्याने माझ्यासहित संपूर्ण भारतभूमीला अश्रू अनावर झाले आहेत असे उद्गार कर्नल आजाद यांनी काढले. तेरा शहीद झाले परंतु एकशे तीस करोड भारत भूमीच्या रक्षणासाठी आता उभे उभे आहेत भारत हे दुःख विसरू शकत नाही , अमर जवान हे देशाची प्रेरणा आहेत  असे उद्गार मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी काढले. मंचचा वृक्षारोपण तसेच देहदानाचा संकल्प या उल्लेखनीय कार्याबद्दल बागले डॉक्टरांनी उद्गार काढले. उस्मान भाई मन्यार यांनी कार्यक्रमाचे आभार मानले मंचच्या देशसेवेच्या उल्लेखनीय कार्यावर दृष्टीक्षेप टाकला 'प्रसंगी गणेश पाडळे, मनीषा लहारे , जावेद शेख , सद्दाम शेख , निलेश लंके प्रतिष्ठान चे ओमकार नवरखेले शाही जामिया मस्जिद ट्रस्ट चे हाजि अकबर साहेब व मंचचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post