प्रदीप परदेशी यांचा विजय, भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन

 प्रदीप परदेशी यांचा विजय, भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदननगर : नगर महानगरपालिका पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी यांनी मोठा विजय मिळवल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी परदेशी यांचे अभिनंदन केले आहे. आ.पाटील यांनी व्टिट करून नगरमधील मतदारांचे आभार मानले आहेत. आ.पाटील यांनी म्हटले आहे की, भाजपाने अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे. आमचे उमेदवार प्रदीप परदेशी यांनी वॉर्ड क्र 9 मध्ये झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारावर दणदणीत विजय मिळवला. शहर-जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत भाजपालाच कौल देणाऱ्या मतदारांचे आभार!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post