डिटोनेटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडून लाखोंची रोकड लंपास... नगर जिल्ह्यातील घटना

 

डिटोनेटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडून लाखोंची रोकड लंपास... नगर जिल्ह्यातील घटनानगर: अज्ञात चोरट्याने डिटोनेटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडून या मशिनमधील 3 लाख 17 हजार रुपयांची रोकड व 2 हजार रुपये किंमतीचा डिव्हीआर चोरुन नेल्याची घटना काल मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे घडली.

समनापूर येथील राजेंद्र रोकडे यांच्या मालकीच्या गाळ्यामध्ये इंडीया वन लिमीटेड या कंपनीचे एटीएम मशिन आहे. अज्ञात चोरट्याने काल पहाटे डिटोनेटरचा स्फोट घडवून हे मशिन फोडले. या मशिनमधील रक्कम घेवून त्याने पोबारा केला. एटीएम मशिन फोडल्याबाबतची घटना सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आली. कामगार पोलीस पाटील गणेश शरमाळे यांनी या चोरीची माहिती शहर पोलीस ठाण्यात कळविली.

घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे हे घटनास्थळी दाखल झाले. याबाबत धर्मेंद्र वर्मा यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post