विरोधकांकडून रडीचा डाव, ‘तो’ व्हिडिओ बनावट....गोविंद मोकोटेंच्या बंधूंचा खुलासा

विरोधकांकडून रडीचा डाव, ‘तो’ व्हिडिओ बनावट....गोविंद मोकोटेंच्या बंधूंचा खुलासानगर- जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आमदारकीच्या निवडणुकीत झालेला पराभव, तसेच आगामी बाजार समिती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसू लागलेला पराभव सहन होत नसल्याने विरोधकांकडून गोविंद मोकाटे यांना बदनाम करण्याचा डाव रचला असल्याचा हल्लाबोल मोकाटे यांचे बंधू सुंदर मोकाटे यांनी विरोधकांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत केला.

      गोविंद मोकाटे यांच्या वर गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुंदर मोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन यामागे मोठे राजकीय षडयंत्र असुन बनावट व्हिडिओ व्हायरल करुन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमची बदनामी करण्याचा कुटील डाव विरोधकांकडुन खेळला जात असल्याचे सांगितले. बनावट व्हिडिओ व्हायरल करणा-या विरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच सत्य समोर येईल.
       आमच्याकडे त्यांची अनेक प्रकरणे आहेत ते बाहेर काढल्यास त्यांना जिल्ह्यात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मुलीवर खोटे गुन्हे दाखल करून जीवनातून उठविण्याचा प्रयत्न केला. आताही आण्णाचे राजकीय करियर उध्दवस्त करण्याचा कुटील डाव आखला जात आहे. परंतु जनता यांना माफ करणार नाही. यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे असून हे ही लवकरच जेलमध्ये असतील.
         विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत हे जनतेला चांगलेच माहित आहे. यांचे सारे उद्योग जनतेला चांगलेच माहित झाल्याने सर्वच निवडणुकीत जनतेने यांना नाकारले आहे.  नगर तालुक्यातील उत्तर भागात गोविंद मोकाटेंचे वाढते प्रस्थ तसेच आगामी निवडणुकांमध्ये अडसर ठरणा-यांना खोट्या नाट्या केसेस मध्ये अडकविण्याचे यांचे उद्योग जगजाहीर आहेत.
         विरोधकांकडुन कोणते अमिष दाखवून गुन्हा दाखल करण्यात हे समोर आल्याशिवाय राहणार नाही. आमचा पोलीस यंत्रणा व न्यायालयीन व्यवस्थेवर पुर्णतः विश्वास असुन लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल असे सुंदर मोकाटे यांनी सांगितले. 
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव समोर दिसताच पांगरमल दारुकांडात असाच रडीचा डाव खेळून विनाकारण गोविंद मोकाटे व भाग्यश्री मोकाटे यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तोच प्रकार आता विरोधकांकडून खेळला जात आहे. परंतु गेल्या निवडणुकीत ही जनतेला सत्यता माहीत असल्याने आमचा विजय झाला. यांचे कुटील राजकारण जनता चांगलेच ओळखुन असल्याने आगामी निवडणुकीत जनता परत यांना यांची जागा दाखवणारच आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post