पारनेरमध्ये महाविकास आघाडी नाहीच...औटी विरूद्ध लंके सामना रंगणार!

 

पारनेरमध्ये महाविकास आघाडी नाहीच...औटी विरूद्ध लंके सामना रंगणार!नगर  :  पारनेर नगर पंचायतचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. यात मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यात 13 जागांसाठी  89 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात काँग्रेसकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे पारनेरची निवडणूक ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात होणार आहे. शिवसेनेकडून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इतर मागासवर्गाच्या चार प्रभागांत निवडणूक स्थगित झाल्याने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच चार प्रभागांतील उमेदवारी अर्ज मात्र आज स्वीकारले नाहीत. त्यामुळे नगरपंचायतीच्या जाहीर झालेल्या १७ जागांपैकी फक्त 13 जागांसाठीच निवडणूक होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post