काळजी करू नका... रिझर्व्ह बँकेचे निर्बंध लवकरच उठतील.... नगर अर्बन बँकेच्या संचालकांना विश्वास


काळजी करू नका... रिझर्व्ह बँकेचे निर्बंध लवकरच उठतील.... नगर अर्बन बँकेच्या संचालकांना विश्वासनगर: नगर अर्बन बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार करून चारच दिवसांपूर्वी कारभार हाती घेणार्या संचालक मंडळासमोरील आव्हान वाढलं आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  मोठा निर्णय घेत  सहा डिसेंबरला  नगर अर्बन बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले आहे. यानुसार खातेदार दहा हाजारा पेक्षा अधिक रक्कम काढू शकणार नाहीत, तसेच बॅँकेला या पुढील विविध आर्थिक निर्णय घेण्याअगोदर आरबीआयची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. 

या पार्श्वभूमीवर खातेदार,ठेवीदारांमध्ये चिंता व्यक्त होत असताना बँकेचे चेअरमन राजेंद्र आगरवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे खातेदार,ठेवीदारांना दिलासा आणि विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. चेअरमन आगरवाल यांनी म्हटले आहे की, 

बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक ०१/०८/२०१९ रोजी प्रशासक यांची नियुक्ती केली व दिनांक ०१/१२/२०२१ अखेर पावेतो म्हणजेच २ वर्ष ४ महिने प्रशासकांनी कामकाज पाहीले.

प्रशासकांची बँकेवर नियुक्ती झाली त्या वेळी बँकेचा एनपीए हा २९.५२ टक्के होता तर ते गेले त्यावेळी बँकेचा एनपीए हा ७०.७१ टक्के होता.प्रशासकांनी वसुली, ठेवी, शेअर्स, डि मॅट, गोल्ड लोन, नवीन खाते, इतर कर्ज यामध्ये बँकेचे अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारी यांचेकडुन काही एक कामे करुन घेतली नाहीत व अधिकार दिले नाहीत, व सर्व निर्णय प्रशासकांचे केंद्रस्थानी होते, मंजुरी दिली जात नव्हती, त्यामुळे बँकेचा एनपीए वाढण्यास मदत झाली आहे. प्रशासकांचे नाकर्तेपणामुळे ही दुर्दैवी बाब संचालक मंडळ यांचेवर उद्भवली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जे निर्देश/निबंध दिलेले आहेत ते तात्पुरते स्वरुपाचे असुन आम्ही संचालक मंडळ यांनी वसुली केल्यानंतर सदर निर्देश/निबंध भारतीय रिझर्व्ह बँक मागे घेतील.

नवीन संचालक मंडळाची १ तारखेला निवड झाल्यानंतर बँकेचे मोठेमोठेकर्ज खातेदार यांना समक्ष प्रधान कार्यालयात बोलावून वसुली बाबत चर्चा केली असुन त्यामध्ये मोठया प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून जोनवारी २०२२ अखेर पर्यंत ६० ते ७० कोटी रुपयांपर्यंत वसुल होणेची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ५० ते ६०कोटी पर्यंत ठेवी वाढण्याची शक्यता आहे. सदर बंधने १/२ महिन्यात उठविले जातील असे संचालक मंडळाने आश्वासीत केले आहे. बँकेचे नवीन संचालक मंडळ ०१/१२/२०२१ रोजी रुजु झाले रिझर्व्ह बँकेने प्रशासक असताना निबंध लावले पाहीजे होते परंतु प्रशासक आरबीआय चा प्रतिनिधी असल्याने संचालक मंडळ अस्तीत्वात येताच सदरचा निर्णय घेतलेला आहे. सर्व ठेवींना ५ लक्ष ठेवीचे विमा संरक्षण आहे. त्यासाठी ठेवीदार, खातेदार यांनी घाबरणेचे कारण नाही बँकेवर विश्वास ठेवावा. बँक पुन्हा सुस्थितीत वसुली करुन येईल आश्वासीत करत आहे.बँकेची आर्थिक परिस्थिती सृदृढ असल्यामुळेच रिझर्व्ह बँकेने नुकतीच बँकेच्या निवडणुकीला परवानगी दिली. बँकेची असलेली सुदृढ परिस्थितीमुळे आरबीआयचे निबंध लवकरच उठतील अशी आम्हाला खत्री आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post