मंत्रीच त्यांचं ऐकत नाही, हे कसले प्रदेशाध्यक्ष?....भाजपचा नाना पटोलेंना टोला

मंत्रीच त्यांचं ऐकत नाही, हे कसले प्रदेशाध्यक्ष.... 
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे  हे ३६२ मतांनी विजयी झाले आहेत. यावेळी बावनकुळेंनी पक्षाचे आणि मतदारांचे आभार मानले आहेत. तर हा नाना पटोलेंचा पराभव आहे, ज्याचे मंत्रीच त्यांचं ऐकत नाही, हे कसले प्रदेशाध्यक्ष, अशी खोचक टीकाही यावेळी बावनकुळे यांनी केलीये. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोन मंत्र्यांच्या दबावाखाली आले. त्यांनी उमेदवार बदलला. एका तिकीट दुसऱ्याला मतं टाकायला लावले. ही पक्षातील हुकुमशाही मतदारांना, जनतेला मान्य नव्हती. काँग्रेसमध्ये यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. याचा मोठा फटका विदर्भात काँग्रेसला बसणार आहे. छोटू भोयर यांनी देखील स्वत:ला मतदान केलं. त्यांनी देखील काँग्रेसला मतदान केलं नाही".

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post