निवडणुकीच्या मतदान केंद्रामध्ये व मतमोजणी केंद्रामध्ये सी.सी. टी. व्ही. कॅमेरे बसवा

 मनपा कर्मचारी पतसंस्था निवडणुकीच्या मतदान केंद्रामध्ये व मतमोजणी केंद्रामध्ये सी.सी. टी. व्ही. कॅमेरे बसवा


सहकार पॅनलचे बाबासाहेब भिमराज मुदगल यांची मागणी नगर  - अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., अ.नगर निवडणूक 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सदर मतदान व मतमोजणी त्याच दिवशी होणार आहे. परंतु विरोधी पॅनलकडून यापूर्वीच माननीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवून खोट्या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. परंतु आमचा सहकार विभागातील शासकीय यंत्रणेवर पूर्ण विश्वास असून आतापर्यंतची सर्व प्रक्रिया त्यांनी कायदेशीर मार्गाने हाताळली आहे.निवडणूकीतील मतदान व मतमोजणी ही पारदर्शक होणे करिता आमच्या पॅनलच्या वतीने विनंती करतो की, सदरची प्रक्रिया ही सी.सी.टी. व्ही. कॅमेरा बसवून पार पाडण्यात यावी जेणेकरून निकालानंतरही विरोधी पॅनलकडून प्रशासनावर खोटे आरोप होणार नाहीत.तरी सदर अर्जाचा विचार करुन मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रामध्ये सी.सी. टी. व्ही. कॅमेरा बसविण्यात यावे अशी मागणी सहकार पॅनेलचे प्रमुख बाबासाहेब मुदगल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post