नगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणूक... तीन पॅनलमध्ये अटीतटीची लढत

 नगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणूक... तीन पॅनलमध्ये अटीतटीची लढतनगर : जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणुकीत माघारीच्या अखेरच्या दिवशी ९६ उमेदवारांनी माघार घेतली. आता २१ जागांसाठी ६९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे ज्येष्ठांच्या प्रयत्नांना यश आले नाही. जय श्रीगणेश पॅनलचे नेतृत्व संजय कडूस, श्रीगणेश पॅनलचे नेतृत्व विजय कोरडे, तर श्री पावन गणेश मंगलमूर्ती पॅनलचे नेतृत्व सुभाष कराळे, मनोहर डिसले करीत आहेत. जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या २१ जागांसाठी एकोणीस डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक तिरंगी होतअसल्याने चुरशीची होणार आहे. विजयाची समीकरणेही बदलणार आहेत.मतांची विभागणी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post