धक्कादायक....नगर शहरात लस न घेताच मिळतय प्रमाणपत्र....

 शहरात लसीकरण केंद्रावर लस न घेताच सुरु आहे नोंदणीचा धक्कादायक गैरप्रकार

राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
कोरोना लसीकरणमध्ये गैरप्रकार करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणीनगर- शहरातील काही लसीकरण केंद्रावर कोरोनाची लस न घेताच सुरु असलेल्या नोंदणीचा गैरप्रकार थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, संतोष हजारे, अनिकेत येमूल, शहानवाझ शेख, वैभव म्हस्के, विशाल म्हस्के, वैभव शेवाळे, प्रशांत सराईकर, हेमराज भालसिंग, सनी साठे, गणेश मिसाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


अहमदनगर शहरातील अनेक लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्याची केवळ नाव नोंदणी केली जात असून, त्यांना लस न देताच प्रमाणपत्र जारी करण्याचा गैरप्रकार सुरु आहे. सदर नागरिकांनी लस न घेताच केवळ नाव नोंदणी करून लस घेतल्याचे जाहीर केले आहे. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा संक्रमण सुरु आहे. या धर्तीवर ही बाब अत्यंत भयानक आणि गंभीर आहे. यामुळे इतर नागरिकांना गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. अशा कोरोना लसीकरण केंद्रावर चालणार्‍या बनावट कारभाराविरोधात कठोर पावले उचलून कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याप्रकरणी आयुक्तांशी बोललो असून, संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळास दिले. तसेच सदर मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या वतीने मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना देखील देण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post