ज्युनिअर व युथ गटाच्या व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा

 *ज्युनिअर व युथ गटाच्या व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा*नगर : महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 18 वर्षे वयोगटातील मुले व मुलीच्या राज्य स्पर्धा दिनांक 31 डिसेंबर 2021 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये उस्मानाबाद येथे होणार आहे तसेच युथ 21 वर्ष मुले व मुलीच्या राज्यस्तरीय स्पर्धा चंद्रपूर येथे दिनांक 7 ते 9 जानेवारी  2022 या कालावधीत आयोजीत करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी पुणे विभागीय संघ निवडण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या व्हॉलीबॉल संघाची निवड चाचणी स्पर्धा *रविवार दि.19 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 09 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क* येथे घेण्यात येणार आहे. निवड चाचणी स्पर्धेसाठी 18 वर्षे वयोगटासाठी 01/01/2004 व 21 वर्ष वयोगटासाठी 01/01/ 2001 जन्मतारीख असावी. खेळाडूने सोबत आधार कार्ड तीन पासपोर्ट साईज फोटो जन्मतारखेचा दाखला, एस.एस.सी बोर्डाचे प्रमाणपत्र सोबत आणावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव श्री एल बी म्हस्के  यांनी केले आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी निवड चाचणी स्पर्धेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार प्रसादराव तनपुरे, उपाध्यक्ष प्रा.रमेश मोरगावकर, शैलेश गवळी, खजिनदार प्रा.संजय अनभुले, प्रा.बबनराव झावरे यांनी केले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post