नगर जिल्ह्यात TET पेक्षाही मोठा शिक्षक भरती घोटाळा; करोडोंची उलाढाल, भाजपच्या जालिंदर वाकचौरे यांचा मोठा खुलासा

 TET पेक्षाही मोठा शिक्षक भरती घोटाळा : करोडोंची उलाढाल।।।।

  यात नगर जिल्ह्यातही झाला शिक्षक भरती घोटाळा : जालिंदर वाकचौरे (भाजप जि प गटनेता)सदर शिक्षक भरती घोटाळ्याची उच्च स्तरीय चौकशी करावी व संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी

सध्या TET शिक्षक घोटाळा गाजतो आहे.पण यापेक्षाही एक मोठा शिक्षकभरती घोटाळा महाराष्ट्रात झाला आहे पण दुर्दैवाने त्याची चर्चा झाली नाही. TET पास नसलेले हजारो शिक्षक सेवेत घेण्यात आले आहेत हे आपण बघतोय.

TET ची अट २०१३साली लागू झाली व २०१३ साली शिक्षकभरती बंद झाली. यातून पळवाट काढत हे शिक्षक २०१२ पूर्वी आमच्या शाळेत काम करत होते,असे रेकॉर्ड तयार करून अधिकाऱ्यांना पैसे देऊन शिक्षकांना मान्यता मिळवल्या व ते हजारो शिक्षक आज सेवेत रुजू केले आहेत व असे प्रत्येक जिल्ह्यात ५०० पेक्षा जास्त शिक्षक आहेत.


या घोटाळ्याची पद्धत अशी की शिक्षकांच्या सह्या असलेले हजेरीपुस्तक २०१२ पूर्वीपासून दाखवायचे आणि ते शिक्षक २०१२ पासून नोकरीत होते त्यामुळे ते शिक्षक भरतीपूर्वी कामाला होते असे रेकॉर्ड तयार करायचे.त्याला शिक्षणाधिकारी मान्यता मिळवली.याला मंत्रालय स्तरावरून मान्यता दिल्या गेल्या व हे शिक्षक ९ वी व १०वीला शिकवत होते असे दाखवून TET तुन सूट मिळवून घेतली(TET ८वी पर्यंत असते).म्हणजे TET पास होण्याचीही किंमत वसूल केली व TET लागू नसण्याचेही पैसे वसूल करण्यात आले..त्यानंतर या शिक्षकांना शालार्थ आय डी देण्यासाठी स्वतंत्र पैसे घेतले गेले आणि पगार सुरू करण्यासाठी पैसे घेतले.त्यानंतर त्यांच्या पूर्वीपासून नोकरीत जाते म्हणून लाखो रुपयांचा पगाराचा फरकही काढण्यात आले व त्यातही अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतली. 

                 गरीब कुटुंबातील अनेक तरुण शिक्षक यात भरडले गेले असून त्यांना जिल्हा शिक्षणाधिकारी ते मंत्रालय असा किमान १५ लाखापर्यंत खर्च आला आहे.

शिक्षण संस्थेने घेतलेले पैसे पुन्हा वेगळेच.जवळपास२० ते २५ लाख रुपये देऊन या नोकऱ्या मिळाल्या आहेत. यातील अनेक शिक्षकांनी कर्ज काढले आहे. ते कर्जबाजारी झाले आहेत.

हा घोटाळा इतका व्यापक आहे की प्रत्येक जिल्ह्यात ही संख्या किमान ५०० ते १००० असावी असा अंदाज आहे.

इतके शिक्षक गुणिले किमान १० लाख धरले तरी या घोटाळ्याचा अंदाज येईल..हा घोटाळा TET लाही मागे टाकू शकेल...

हा घोटाळा उघड करण्याचा सोपा मार्ग म्हणजे २०१२ नंतर शिक्षक भरती बंद असताना २०१२ नंतर जिल्ह्यात नवे शिक्षक किती भरती झाले ही संख्या  घेतली की हा घोटाळा उघड होतो. त्याकाळात अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असताना व शिक्षकभरती बंद असताना ही शिक्षकभरती झाली कशी ? 

 TET पास नसताना हे शिक्षक या व्यवस्थेत कसे आले ? हा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारायला हवा.

आज साने गुरुजी जयंती आहे

महाराष्ट्रातील नवीन शिक्षक भरतीचे हे वास्तव आहे.

इतके लाख रुपये देऊन सेवेत आलेले शिक्षक कसे स्वप्नाळू राहतील...??

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post