भाजप देणार शिवसेनेला मोठा धक्का !.... मंत्री राहिलेला बडा नेता फडणवीसांच्या संपर्कात

 

भाजप देणार शिवसेनेला मोठा धक्का !.... मंत्री राहिलेला बडा नेता फडणवीसांच्या संपर्कातमुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीका आणि आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. अशावेळी शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्ती केली जातेय. शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत हे भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

तानाजी सावंत हे युती सरकारमध्ये जलसंधारण मंत्री राहिलेले आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. अशावेळी आज तानाजी सावंत यांची फडणवीसांच्या भेटीसाठी चांगलीच घुटमळ झाल्याचं पाहायला मिळालं. सांवंत यांची भाजपशी वाढती जवळीक पाहायला मिळत आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मध्यस्तीनंतर तानाजी सावंत यांनी फडणवीसांची धावती भेट घेतल्याचं चित्र विधानभवन परिसरात पाहायला मिळालं. पहिल्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर सावंत यांनी फडणवीसांची भेट घेतली. दरम्यान, स्वत:च्या साखर कारखान्याच्या मुद्द्यावरुन ही भेट झाल्याचं सावंतांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post