राणे म्हणतात...शरद पवार हे तर फक्त साडेतीन जिल्ह्याचे नेते

 

राणे म्हणतात...शरद पवार हे तर फक्त साडेतीन जिल्ह्याचे नेतेमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांबाबत कौतुकोद्गार काढले. 

अमोल कोल्हे भाषणात म्हणाले की, देशातील कुठल्याही नेत्याला शरद पवारांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. भुज भूकंपावेळी शरद पवार यांची माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील वाहवा केली होती, अशी आठवण अमोल कोल्हे यांनी यावेळी करुन दिली. तसेच जर २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधानपदावर का बसू शकत नाही?, असा सवाल उपस्थित करत याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.  अमोल कोल्हे यांच्या या विधानानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. निलेश राणे म्हणाले की, शरद पवार हे राजकारणात इतर पक्षांची मदत घेतल्याशिवाय स्वतःच्या पक्षाच्या जीवावर काही करू शकत नाही, असं निलेश राणे म्हणाले. तसेच शरद पवारांचं नेतृत्व महाराष्ट्रात फक्त साडेतीन जिल्ह्यात आहे, त्यात पण पूर्ण १००% टक्के नाही. दिल्लीमध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राचे सोडून १०० कार्यकर्ते दाखवावे, असा टोला देखील निलेश राणे यांनी लगावला आहे.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post