आरोपी पलायन प्रकरण... पोलिस उपनिरीक्षकासह सहा जण निलंबित


आरोपी पलायन प्रकरण... पोलिस उपनिरीक्षकासह सहा जण निलंबितनगर:  राहुरीच्या कारागृहामधून पाच आरोपींनी पलायन केले होते. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचार्‍यांवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हवालदार संजय राठोड, पोलीस नाईक संजयकुमार जाधव, रोहिदास गुंडाके, पोलीस शिपाई बाळू चाबुकस्वार, व महिला पोलीस शिपाई मनिषा गुंड अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.


शनिवारी पहाटे राहुरी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून मोक्का गुन्ह्यातील आरोपी सागर भांडसह पाच जणांनी पलायन केले होते. यातील तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. तर अन्य दोघे अद्यापही पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. 

या घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. याप्रकरणी उपमहानिरीक्षक शेखर पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक डॉ. काळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी चौकशी केली. काहींचे जबाब नोंदविले. चौकशी अहवाल पोलीस अधीक्षक पाटील यांना सादर केला. यानंतर अधीक्षक पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचार्‍यांचे निलंबन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post