पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तीन मोठ्या घोषणा, बूस्टर डोसबाबतही महत्त्वाची माहिती


पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तीन मोठ्या घोषणा, बूस्टर डोसबाबतही महत्त्वाची माहिती नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील  मुलांचं लसीकरण सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केली. हे लसीकरण नव्या वर्षात 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसंच कनिष्ट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं. 


त्यानंतर दुसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे बूस्टर डोसबाबत मोदींनी केली. ती म्हणजे आरोग्य कर्मचारी अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना  दोन लसीकरणांनंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचं मोदीनी सांगितलं. याची सुरुवात 10 जानेवारी, 2021 पासून होणार आहे. त्यानंतर तिसरी घोषणा म्हणजे 60 वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची सुरुवात करणार असल्याचं यावेळीन मोदींनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post