चंद्रकांत पाटील म्हणतात...छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक विकसित केली, वाजपेयी-मोदींनी त्यावर कळस चढवला

चंद्रकांत पाटील म्हणतात...छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक विकसित केली, वाजपेयी-मोदींनी त्यावर कळस चढवलापुणे:  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या निवडणूक तिकिटांबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा रोख हिंदू व्होटबँकेपर्यंत नेला. 'छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक विकसित केली, वाजपेयी-मोदींनी त्यावर कळस चढवला' असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यातील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी उमेदवारांच्या निवडणूक तिकिटाबाबत भाष्य केले. तिकिट हे पक्षाचे असते. व्होट बँक पक्षाची असते. व्होटबँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक तयार केली. अलिकडच्या काळात ही व्होट बँक अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, मोदी यांनी त्यावर कळस चढवला असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post