रोहित पवारांचा निवडणूकीआधीच पराभव, कर्जत नगरपंचायत निवडणुकीतील राजकारणावरुन चंद्रकांत पाटील यांचे टिकास्त्र

 

आ.रोहित पवारांचा निवडणूकीआधीच पराभव, कर्जत नगरपंचायत निवडणुकीतील राजकारणावरुन चंद्रकांत पाटील यांचे टिकास्त्रनगर : कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ऐनवेळी भाजपाचा अधिकृत उमेदवार राष्ट्रवादीला जाऊन मिळाला व राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. या राजकारणाचे भाजपमध्ये पडसाद उमटले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकाराची दखल घेऊन आ.रोहित पवार यांच्या वर निशाणा साधला आहे. 


चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की,  कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ऐनवेळी भाजपा उमेदवाराचा पाठिंबा मिळवण्याची वेळ राष्ट्रवादीचे Rohit Rajendra Pawar  यांच्यावर आली हा त्यांचा निवडणुकीपूर्वीच झालेला पराभव आहे. Sharad Pawar  यांचा वारसा,राज्यात सत्ता, Ajit Pawar  उपमुख्यमंत्री असूनही रोहीत पवार यांना एकेका जागेसाठी झुंजावे लागते.

याचाच अर्थ जनता भाजपासोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे. सत्तेचा दुरूपयोग आणि धनशक्ती विरोधात असली तरी जनशक्ती आपल्याकडे असल्याने Ram Shinde  यांच्या नेतृत्वाखाली जोरदार संघर्ष करा, असे माझे तेथील कार्यकर्त्यांना आवाहन आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post