मंत्री शंकरराव गडाख यांची पाथर्डी तालुक्यात मोर्चेबांधणी....स्व.अनिल कराळेंच्या आठवणींना उजाळा

 

मंत्री शंकरराव गडाख यांची पाथर्डी तालुक्यात मोर्चेबांधणी....स्व.अनिल कराळेंच्या आठवणींना उजाळानगर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसंपर्क अभियान सुरू आहे. त्यानुसार शिवसेनेचे मंत्री ना. शंकरराव गडाख यांचा जिल्हाभर जिल्हा परिषद गट, गणनुसार पक्ष वाढीसाठी, युवकांचे संघटन करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी दौरे सुरू आहेत. या दौर्‍यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीही सुरू असून जिल्ह्यात शिवसैनिकांना ताकद देऊन पक्ष आणि संघटना मजबूत करण्याचा निर्धार जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला.

रविवारी ना.गडाख यांनी पाथर्डी तालुक्यातील केशव शिंगवे, रुपेवाडी, शंकरवाडी, मिरी, रेणुकाईवाडी, कासारवाडी, जवखेड खालसा, जवखेड दुमाला, हनुमान टाकळी, कोपरे, कामत शिंगवे, आडगाव या गावांना भेटी देऊन तेथील शिवसेना, युवासेना शाखांचे उद्घाटन व शाखा नूतनीकरण केले. यावेळी त्यांनी पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक, ग्रामस्थ यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सूचना दिल्या. तसेच त्यांची निवेदने स्वीकारत प्रश्न मार्गी लावण्याबाबत आश्वासन दिले. तसेच कार्यकर्त्यांना आधार देत, पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांना कोणतीही अडचण आली तरी मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे, या शब्दांत ना. गडाख यांनी उपस्थितांना आश्वासन दिले.

ना. गडाख म्हणाले, जेव्हा संधी मिळेल त्या संधीचं सोनं करावं, दौर्‍यादरम्यान मिरी-करंजी जिल्हा परिषद गटात फिरत असताना या भागात स्व.अनिल कराळे यांनी चांगले काम केल्याचे दिसून आले. 25 वर्षे हा गट शिवसेना पक्षाच्या विचारांवर विश्वास ठेवून साथ देत आहे. अशीच साथ यापुढील कालावधीत द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. जलसंधारण विभागा अंतर्गत सुरू असलेल्या मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून व जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत पाथर्डी तालुक्यात अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. पाथर्डी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 300 पाझर तलाव, बंधारे दुरुस्त करण्यासाठी आराखडा तयार केला असून येणार्‍या काळात जास्तीत जास्त प्रमाणात ही कामे करण्याचा प्रयत्न असणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post