माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या पत्नीच्या विरोधात भाजपकडून उमेदवार नाही... राष्ट्रवादीकडून कोरी पाटी असलेला उमेदवार

माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या पत्नीच्या विरोधात भाजपकडून उमेदवार नाही... राष्ट्रवादीकडून कोरी पाटी असलेला उमेदवारनगर : पारनेर नगरपंचायत निवडणुकीतील अर्ज छानणीत 9 उमेदवारी अर्ज बाद झाले. यात विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी यांच्या पत्नी शिवसेनेच्या जयश्री औटी लढत असलेल्या प्रभाग 9 मधील चार उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. या प्रभागात शिवसेनेच्या ( जयश्री औटींच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार नीलेश लंके यांनी नवख्या उमेदवाराला तिकीट दिले आहे. 

माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी या प्रभाग 9 मधून निवडणूक लढविणार आहेत. त्या पारनेर पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. प्रभाग 9 मध्ये 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील चार अर्ज छानणी प्रक्रियेत बाद झाले. त्यामुळे या प्रभागात उमेदवारी अर्ज छानणीनंतर सहाच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. या प्रभागात भाजपने उमेदवारच दिलेला नाही. त्यामुळे जयश्री औटींसमोर राष्ट्रवादीच्या उमेदवार हिमानी नगरे यांचे आव्हान असणार आहे. जयश्री औटींसमोरील सर्वच उमेदवार नवखे आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post