भारतात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय.... महाराष्ट्र, दिल्लीत सर्वाधिक रूग्ण

भारतात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय.... महाराष्ट्र, दिल्लीत सर्वाधिक रूग्ण नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेत उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा भारतातील संसर्ग वाढतोय. मंगळवारी देशात 16 नवे ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे  देशातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 216 इतकी झाली आहे. राजधानी नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. देशातील एकूण रुग्णापैकी 60 टक्केंपेक्षा जास्त रुग्ण या दोन राज्यातील आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या 11 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 65 इतकी झाली आहे. 


तर जम्मू काश्मीरमध्येही ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे.  दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशातील 216 रुग्णापैकी 77 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post