१०० लसीकरणासाठी चक्क मयत ग्रामसेवकाला नोटीस, तहसील प्रशासनाचा प्रताप

 १०० लसीकरणासाठी चक्क मयत ग्रामसेवकाला नोटीस, तहसील प्रशासनाचा प्रतापहिंगोली: जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील तहसीलदारांनी चक्क मयत ग्रामसेवकाच्या नावाने कोरोना लसीकरणाच्या  मोहीमेसाठी आदेश काढले आहेत. लिंगीपिंपरी येथील ग्रामसेवक डी.डी. झिंगरे यांच सहा महिन्यापूर्वी निधन झालंय. मात्र, तहसीलदार यांनी आता आदेश काढल्याने सेनगाव तहसीलदार यांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक गांवात 100%लसीकरण व्हावं यासाठी मोहीम राबवली जात आहे. त्याकरिता ज्या गावात 75%पेक्षा कमी लसीकरण झाले अशा गावातील ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांच्या सह इतर कर्मचाऱ्यांना नोटीसा बाजवण्यात आल्या आहेत.मात्र, सेनगाव येथील तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांनी चक्क सहा महिन्यापूर्वी मयत झालेल्या ग्रामसेवकाच्या नावे आदेश काढले असल्याचे समोर आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post